विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात येणार आहेत.
केंद्रीय मंत्र्यांसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री हजेरी लावणार असून सभा, प्रचार फेरी, पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील भाजपच्या बुथ प्रमुखांशी "मेरा बुथ सबसे मजबूत" अभियान अंतर्गत वाजता संवाद साधतील.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जाहीर सभा आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत.
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू हे नागपूर व भंडारा येथे पत्रकार परिषद व सभा घेतील.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे मुंबईत सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या जळगावमधील भुसावळ, वरणगाव, मुक्ताई नगर, रावेर येथे सभा होतील.
केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्या अहिल्यानगर येथे सभा होतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कणकवली, शहादा, दहिसर, भोसरी येथे जाहीर सभांना संबोधित करतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूर, सांगली व पुण्यातील तब्बल 10 ठिकाणी सभा घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मालाड, कांदिवली, भिवंडी, भाईंदर येथे जाहीर सभा होणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे जोगेश्वरी, अंधेरी व घाटकोपर येथील प्रचारात सहभागी होतील.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोंडीला पवन कल्याण गरु हे देगलूर, भोकर, लातूर, सोलापूर शहर येथे जाहीर सभा व रोड शो मध्ये सहभागी होतील.
भाजपचे दिल्लीतील आमदार व राज्य सरचिटणीस भगवानदास सबनानी हे मुलुंड, घाटकोपर येथील प्रचारात सहभागी होतील.
ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देवजी हे मालाडमध्ये ओडिशा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
मध्य प्रदेशचे राज्यमंत्री दिलीप अहिरवार हे मुंबईत प्रचार करताना दिसतील.