विधानसभा निवडणूक 2024

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठका होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो कार्यकर्ते घेऊन अजित पवार यांना देवगिरी बंगल्यावर जाऊन भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीची निफाडची जागा भाजपला सुटावी या करिता यतीन कदम समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून महायुतीकडून निफाडच्या जागेचा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. निफाड विधानसभा मतदारसंघातली ही जागा राष्ट्रवादीकडे आहे.

राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. याच जागेसाठी अजित पवार यांनी क्विक सर्व्हेचा प्रयोग केला असल्याची माहिती मिळत आहे. यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात क्विक सर्व्हे करून क्विक सर्व्हेत जो पुढे असेल त्याला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?