विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आज भाजपला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईतील कुर्ला मतदारसंघातील भाजपचे महामंत्री स्वप्नील येरूनकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल ते म्हणाले, “ज्यांनी आपला पक्ष चोरला त्यांच्याकडून तुम्ही आपल्या शिवसेनेत आलात. त्यांना राजकारणात जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.