BJP 2nd list published 
विधानसभा निवडणूक 2024

भाजपची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांची नावे जाहीर

भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. देवयानी फरांदे, हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. देवयानी फरांदे, हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 121 उमेदवार जाहीर केले आहेत. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राम भदाणे यांना धुळे ग्रामीण मधून तर श्याम खोडे यांना वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत देशमुखांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उणेदवारी देण्यात आली आहे. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

भाजप उमेदवारांची यादी जाहीर

राम भदाणे- धुळे ग्रामीण

चैनसुख संचेती – मलकापूर

प्रकाश भारसाखळे – अकोट

विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

श्याम खोडे – वाशिम

केवलराम काळे – मेळघाट

मिलिंद नरोटे – गडचिरोली

देवराम भोंगले – राजुरा

कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

करण देवताळे – वरोरा

देवयानी फरांदे – नाशिक मध्य

हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

कुमार आयलानी – उल्हासनगर

रवींद्र पाटील – पेण

भीमराव तापकीर – खडकवासला

सुनील कांबळे – पुणे छावणी

हेमंत रासने – कसबापेठ

रमेश कराड – लातूर ग्रामीण

देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

समाधान आवताडे – पंढरपूर

सत्यजित देशमुख – शिराळा

गोपीचंद पडळकर – जत

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा

Special Report | Balasaheb Thorat | थोरातांचा समन्वय सार्थकी लागणार? अदलाबदल करून तोडगा निघणार?

दहिसर विधानसभेची उमेदवारी विनोद घोसाळकर यांना जाहीर

36 जागांवर महायुती अन् मविआचीही 'वेट अँड वॉच' ची भूमिका