महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारसभांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून संघर्ष होण्याची शक्यता असताना अखेर लोणीकरांनी त्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये बबनराव लोणीकर म्हणत आहेत मराठ्यांची मतं ही बोटांवर मोजण्याइतकी हेत. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांची डोकेदुखी वाढली असून त्यांनी आता या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
थोडक्यात
मराठ्यांची मतं ही बोटांवर मोजण्याइतकी
बबनराव लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लोणीकरांचं स्पष्टीकरण
बबनराव लोणीकर यांना भाजपने परतुर मतदारसंघातून सलग आठव्यांदा उमेदवारी दिली आहे. आष्टीतील त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बबनराव लोणीकर आष्टीतील अठरापगड जातीचा समाज कशाप्रकारे आपल्या पाठीशी आहेत, हे सांगत होते. मात्र, या नादात त्यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या गावात मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत, असे बबनराव लोणीकर व्हिडीओ म्हणताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओबाबत बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण
"माझ्या भाषणात मी म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावात कमी आहे. हे गाव एससी. एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लिम अशा अठरापगड जातींचं गाव आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हिडीओ व्हायरल केला असल्याचंही लोणीकरांनी आरोप केला आहे.