विधानसभा निवडणूक 2024

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का, बड्या नेत्यानं साथ सोडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते बंडखोरी करत आहेत. काही नाराजांनी पक्ष बदलून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

शिवसेनेचे (शिंदे) उपनेते व माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. घोलप यांनी काल (शनिवार, २६ ऑक्टोबर) शिंदे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधून घरवापसी केली आहे.

दरम्यान, या घरवापसीवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. ठाकरे यांनी शिवबंधन बांधून घोलप यांचं शिवसेना ठाकरे गटात स्वागत केलं.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; पृथ्वीराज चव्हाण पराभूत

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव