विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील नेते आपल्या सभा आणि पत्रकार परिषद घेत आहेत आणि यादरम्यान नेते विरोधकांवर अनेक टीका टिपण्णी करत करत त्यांच्यावर आरोप करत आहेत. तर यात अनेक आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणूक काळात शेवटच्या टप्प्यात घेरलं आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कोविड काळात बाजार समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी केले. प्रत्यक्षात मात्र ते व्हेंटिलेटर ६ ते ७ लाख रुपयांचेच होते बाकीचे उर्वरित पैसे स्वतःच्या आलिशान वाड्यासाठी अर्थात बांगला बांधण्यासाठी वापरले.
तर बाजार समितीचे ७५ लाख रुपयांचे नुकसान करून ते ७५ लाख स्वतःच्या खिशात घातले असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर भामा - आसखेड धरणाचे पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देताना पाण्याचा सौदा करून आर्थिक लाभ मिळवून घेतला असल्याचा देखील आरोप काळे यांनी मोहितेंवर केला आहे. आता या आरोपांवर दिलीप मोहिते काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.