थोडक्यात
निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज
एसडीओ कार्यालयाकडून मतदान साहित्याचं वितरण
अमरावती जिल्ह्यात 160 उमेदवार निवडणूक रिंगणात
सूरज दहाट, अमरावती
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यातच आता अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक एसडीओ कार्यालयातून मतदान केंद्राचे साहित्य वितरित होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघांमध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 हजार 917 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात 1 हजार 282 मतदान केंद्र असून यामध्ये 12 लाख 52 हजार 680 महिला तर 12 लाख 93 हजार 681 पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: