महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, अनेक लोक मला भेटत आहेत. शुभेच्छा देत आहेत. वारं बदलतंय. पहिल्यांदाच निवडणुकीला उभा आहे. त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतोय अतिशय उत्तम आहे. जे मी 100 टक्के देऊ शकतोय ते मी देतो. जनतेला आवाहन करेन, पहिल्यांदा तुमचा मुलगा निवडणुकीला उभा आहे. एक माहिम दादरकर उभा आहे. त्यामुळे तुमचं मत वाया जाऊ देणार नाही. एवढी मी तुम्हाला नक्की खात्री देतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, राज साहेबांना तुमचा पाठिंबा असुद्या. मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल. जो निकाल तुम्हाला दिसेल तो पक्षाच्या बाजूने, राज ठाकरेंच्या बाजूने सकारात्मक दिसेल. असे अमित ठाकरे म्हणाले.