विधानसभा निवडणूक 2024

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिममधून उमेदवारी मिळाली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या अमित ठाकरेंनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर पोटात गोळा आल्याचे सांगितले.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी काल जाहीर केली. या यादीत माहिममधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला आहे, असं म्हणाले. ते आज ‘शिवतीर्था'वर म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत होते.

अमित ठाकरे यांना पहिली निवडणूक लढवणार आहात, काय भावना आहेत, कसं वाटतंय असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले “माझ्याच आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझे नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. कारण आता मला समजलं आहे की, माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. मी याआधी जसं वावरत होतो, तसं आता वावरु शकत नाही. मी जे स्वतंत्रपणे राहत होतो, तसं आता राहू शकणार नाही. कारण त्या शासकीय पदाचे ओझं इतकं असतं. मी ते ओझं घ्यायला तयार आहे. फक्त आता पोटात गोळा आला आहे. जो येईल असे मला वाटले नव्हते” असे अमित ठाकरे म्हणाले.

“मी लहानपणापासून दादर माहीममध्ये वाढलो आहे. माझी आई, माझे वडील किंवा मी आमच्या तीन पिढ्या आम्ही इथे वाढलो आहे. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ आम्ही जवळून ओळखतो. मी अनेकदा इथे चालत असताना मला अनेकजण भेटतात. ते त्यांच्या समस्या सांगतात. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन आहे” असेही अमित ठाकरे म्हणाले

२०१९ मध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्या विरोधात उमदेवार दिला नव्हता. मात्र, आता अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना, दादर माहीममधून उमेदवार देणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, मी सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराला शुभेच्छा देतो. राजसाहेब ठाकरे हे कायमच ठाम भूमिका घेतात. ती उपकाराची भूमिका नसते. मी उपकार केलेत अशी त्यांची भूमिका नसते. तसेच समोरच्याने त्याची परतफेड करावी, अशी कधी त्यांची इच्छाही नसते”, असे अमित ठाकरेंनी म्हटले.

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया