ajit pawar 
विधानसभा निवडणूक 2024

महायुतीमध्ये जाण्याबाबत अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले. त्यावेळी महायुतीमध्ये जाण्याचे आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरविले होते. अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते व उमेदवार राज्यभर प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले. त्यावेळी महायुतीमध्ये जाण्याचे आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरविले होते. माझी सही होती, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आणि छगन भुजबळ आणि नितीन पवारांसह अनेकांच्या सह्या होत्या. पण त्यावेळी अशी काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही. पण सतत कार्यकर्ते आणि सहकारी म्हणायचे कोरोनात वेळ गेला. अजित पवारांच्या या विधानांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

थोडक्यात

  • एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले

  • त्याच वेळी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरविले होते

  • अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्यानंतर वर्षभराने अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सहभागी झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले हे दोन राजकीय भूकंप होते.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान