बारामतीमध्ये अजित पवारांची देखील सांगता सभा पार पडली. या सभेला बारामतीकरांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. बारामतीची ही राजकीय लढाई यंदा पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची ठरलीये. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे लागून राहिलंय. असं असतानाच अजित पवारांची सांगता सभेलाही मोठ्या संख्येने बारामतीकर हजर होते.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली, दादा मिश्किली करत म्हणाले...
अजित पवारांची बारामतीमध्ये सांगता सभा सुरु असताना त्याठिकाणी एका श्वेता नावाच्या मुलीच्या हरवण्याची खळबळ माजू लागली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांत करत दादा म्हणाले की, ‘श्वेता कोकाटे नावाची मुलगी… ती काय समोर आहे… कुठे हरवली राव’, असं अजित पवार म्हणाले. तर दादांच्या सभेत कशी मुलगी हरवेल? अशी मस्करी करत दाद पुढे म्हणाले, ही काय 500 रुपये देऊन आलेली जनता नाही ही आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून दादांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यावर त्यांना थांबवत अजित पवार म्हणाले, अरे थांबा पुन्हा ६ वाजतील प्रचाराची वेळ संपेल.. असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे खोचकपणे भाष्य करु लागले.