थोडक्यात बातमी
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मतदान सुरू आहे, ज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील सहा पक्षांमध्ये मुख्य लढत आहे.
अजित पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. २८८ जागांसाठी मतदान होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीतील सहा पक्षांमध्ये मुख्य लढत दिसून येत आहे. याचदरम्यान, अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बारामती येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सर्वांना निर्णय घ्यायचाय कोणाच्या हातात महाराष्ट्र द्यायचा आहे. योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्रात सातत्याने घौडदौड पुढे देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहिल अशा प्रकाचा प्रयत्न करावा. अस ते म्हणाले. तसच आईने आधीच मतदान केलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, एकाच मतदान केंद्रावर दोन प्रतिस्पर्धी उमेदवार, म्हणजेच युगेंद्र पवार आणि अजित पवार मतदान करणार आहेत. यावर प्रश्न विचारले असता, अजित पवार यांनी उत्तर दिलं की, "सगळ्यांच्या प्रयत्नाने हा योग जुळून आलाय," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.