विधानसभा निवडणूक 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर होतात अभिजीत पाटलांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यातच उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात असून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर होतात अभिजीत पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिजीत पाटील थेट अंतरवली सराटीला रवाना झाले आणि दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अभिजीत पाटील आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अभिजीत पाटलांची लढत माढ्याचे आमदार बबन दादा शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत असणार आहे.

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'

BJP Batenge To Katenge: 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा, वाढला राजकीय पारा

भरपावसात फडणवीसांची सभा, पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस

Ravindra Dhangekar Kasaba Peth Assembly constituency: रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघासाठी सज्ज