थोडक्यात
धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस
लाडक्या बहिणींबाबत केलेल्या वक्तव्याची आयोगाकडून दखल
आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
सतेज औंधकर, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला असून नोटीस बजावण्यात आली आहे. वक्तव्याबाबत तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाडिकांवर गुन्हा दाखल केला आहे.