महाराष्ट्राचा महानिकाल

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

shweta walge

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत असणार आहे. उद्यापासुन सुरु होणारं संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पंढरपूर मतदार संघाचा लागला धक्कादायक निकाल

पंढरपूर मतदार संघाचा निकाल धक्कादायक लागला आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे अशी भूमिका आता मनसे नेते आणि उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घेतली. याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे व्हीव्हीपॅट मधील स्लीप मोजणीची मागणी केली होती. मात्र मनसेची मागणी फेटाळली. अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात इव्हीएम मशीन बाबत आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लिप मोजणी बाबत धाव घेणार आहे. त्यामुळे राज्यातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत होता मनसे न्यायालयात जात आहे.

मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवणार-संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवणार अस ते म्हणाले.नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

शिवसेनेचे आमदार मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक होणार आहे. बैठकीला 29 आमदार उपस्थित राहणार आहेत. आमदारांना एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

शरद पवार आज कराड दौऱ्यावर

शरद पवार आज कराड दौऱ्यावर. निकालावर शरद पवार काय बोलणार का याकडे लक्ष

रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपचे पराभूत आमदार राम सातपुते यांनी केली आहे. रणजितसिंह यांनी भाजप विरुद्ध काम केल्याचा सातपुतें यांनी लगावला आहे.

भाजपकडून आज केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक होणार

भाजपाकडून आज केंद्रीय निरीक्षक नेमणूक केल्या जाईल. केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपा पक्षाची अंतर्गत आज बैठक होणार. बैठकीत भाजपा गटनेता निवडला जाईल. राज्यपालांनी वेळ दिल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आपले निकटचे प्रतिस्पर्धी व माकपप्रणित एलडीएफ आघाडीचे उमेदवार सत्येन मोकेरी यांच्यावर ४.१ लाख मताधिक्याने विजय मिळविला आहे. सक्रिय राजकारणात गेली अनेक वर्षे असलेल्या प्रियांका गांधी आयुष्यात पहिल्यांदाच लढविलेली निवडणूक जिंकली आहे.

नोव्हेंबर 24, 2024 रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या बातम्या जाणून घ्या. ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका