राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेंस कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
केंद्रीय कॅबिनेटचा देशातल्या १ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
रसायनमुक्त शेतीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणार मदत
नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकार आखतंय मोठं धोरण
केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांची माहिती
मातीच्या गुणवत्तेवर सरकार करणार काम
पनवेल मार्गावरील कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणार्या एका गाडीने पनवेल जवळील तक्का येथील उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेवून काही क्षणातच ही गाडी आगीच्या भस्मसात झाली. सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले आहेत.
अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात हिट अँड रनची घटना घडली असून मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या भरधाव कारने पायी चालणाऱ्या नागरिकांसह दुचाकी आणि चार चाकी गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. कोतवाली पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले.
महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होतोय? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. असं असताना एक नवीन अपडेट सुत्रांकडून आली आहे ती म्हणजे, 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची शक्यता असून सरकारचा शपथविधी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठा खुलासा केला आहे. आम्ही अदाणीचे १०० कोटी रु. घेतले नाहीत, अदानीवर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने काँग्रेस सरकारने नाकारलं स्किल डेव्हलपमेंटचं डोनेशन.
महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होतोय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. निकाल येऊन 48 तास झाले तरी ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर नाही, ना सत्तास्थापनेचा दावा केला
संगमनेरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
संगमनेरमधील निळवंडे येथे उतरले सैनदलाचे हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर पाहान्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी
तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे लँड; सर्व सैनिक सुरक्षित
ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्पेटमुळे पवारांच्या 9 उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण अडसड यांच्या निवासस्थानी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट झाली. तर भाजपाचे जेष्ठ नेते अरुण अडसड यांच्या कडून हरिभाऊ बागळे यांचे स्वागत केले आहे. अरुण अडसड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी दिली अडसड यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा श्री. एकनाथजी शिंदे व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीमुळे आजारातून बरे झालेले शेकडो रुग्ण आज श्री सिद्धीविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मंत्रिपदाची मागणी
भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे तर प्रतोदपदी सुनिल प्रभू यांची निवड करण्यात आलीय.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झालीये. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडावी यासाठी नाशिकमध्ये होम हवन आणि आरत्या केल्या जाताय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे होम हवन करण्यात आला असून पंचमुखी हनुमान, श्रीराम आणि हनुमान मंदिरात आरत्या केल्या जात आहे. धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीनं निलेश गाढवे यांच्याकडून या होम हवन आणि आरत्यांचे आयोजन करण्यात आले होते.