निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.
याचपार्श्वभूमीवर माझा वळसे पाटलांना पाठिंबा आहे असं महत्त्वाचं वक्तव्य नरहरी झिरवळांनी केल आहे. एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नाही असं देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. वळसे पाटील मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील अस देखील नरहरी झिरवाळ याठिकाणी म्हटले आहेत तर आम्ही गद्दार नाही आधीपासूनच घडाळ्यावर लढतो आहे.