विधान भवनासमोर आज पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवणारी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. या बॅनर मध्ये पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटल वर कारवाई झाली? असा सवाल एका रुग्णातर्फे विचारण्यात आला आहे. 'लोकशाही मराठी'ने या किडनी तस्करीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री पुण्यातील या आरोग्य यंत्रणेवर विचारलेल्या प्रश्नाला नेमकं आज काय उत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष असेल.