ललित पाटीलला ससून मध्ये खोट्या पद्धतीने ठेवणारे ठाकूर नावाचे डीन यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही. यांना जे काही रजेवर पाठवलेला आहे या प्रकरणात पाठवलेलं नाही, असे दानवे म्हणाले. तसेच पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही, नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही, ललित पाटीला ज्या पद्धतीने मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबल वर कारवाई केली आहे. कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे शंभर टक्के जरी असला तरी कॉन्स्टेबल तेवढी हिंमत नसते वरिष्ठ अधिकारी सहकार्य करण्याशिवाय ललित पाटील मदत झालेली नाही. संभाजीनगरला येऊन अमहदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली. खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली याचाच अर्थ ड्रग्स चे कारखाने उघड उघड चालू आहे, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.