मतदारराजानं आपला निर्णय दिलाय... फक्त तो निर्णय आता 23 नोव्हेंबरला सर्वांसमोर येणार आहे... सत्तेची चावी कुणाच्या हातात येणार हे आता निकालाच्याच दिवशी कळेल.. मात्र त्याआधी लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोलसमोर आलाय... या एक्झिट पोलनुसार कुणाची सत्ता येणार आणि कुणाला धक्का बसणार, हे आज आपण बघणार आहोतच... तसंच निवडणुकीच्या आधी सरकारनं लाडक्या बहिणींसाठी योजना आणली.. त्या योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांच्या योजनेला तोड देण्यासाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली... त्यामुळे कुणाच्या योजनेला किती प्रतिसाद मिळणार आणि यंदाच्या निवडणुकीत कुणाचा बोलबाला असू शकतो... पाहूयात आमच्या लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलचा अंदाज आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये.....