दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करतानाचा फोटो भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत दाखवला. सुधाकर बडगुजर आणि दाऊद कनेक्शन काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एसआयटी स्थापना करण्याची घोषणा केलीय. सुधाकर ब़डगुजर याचे सलीम कुत्ताशी संबंध काय याचीही चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. सलीम कुत्तासोबत पार्टी म्हणजे देशविरोधी कृत्य असल्याचा आरोप नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी केलाय.