आज मकर संक्रातनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पाले भाज्या आणि फळ भाज्यांची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये तीळ गुळाचा वापर देखील करण्यात आला आहे. ऊस, गाजर, सिमला मिरची, हरभरा, विविध पाले भाज्यांचा वापर केला आहे. तसेच रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात आला आहे. आज रुक्मिणी मातेला वानवसा देऊन दर्शन घेण्यासाठी हजारो महिला भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाल्या आहेत.