सरकारनं 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी या दुष्काळ जाहीर करण्यात सत्ताधाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप करत चाळीस तालुक्यांपैकी जवळपास 35 तालुके सत्ताधाऱ्यांचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. तरीही सरकारनं फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त जाहीर केल्याचा आरोप होत आहे. त्यातले बहुतांश तालुके सत्ताधारी आमदारांचे आहेत त्यामुळं दुष्काळ फक्त सत्ताधार्यांच्या अंगणात पडला का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही काही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळं सुहास कांदे हे नाराज आहेत. पण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर का केला नाही असा आरोप होऊ लागला आहे.