Lightning Strikes on Tree : देशात मान्सूनने (Monsoon) दणका दिला आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशा हवामानात वीज पडणे सामान्य आहे. पावसाळ्यात झाडाखाली जाऊन उभे राहू नका, कारण वीज सर्वप्रथम झाडांवर पडते, असा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि पावसात भिजू नये वीज पडू नये म्हणून अनेकदा झाडाखाली आडोशाला बसतात. सध्या सोशल मीडियावर लाइटनिंग स्ट्राइक्स ऑन ट्रीचे लाईव्ह फुटेज समोर आले आहे. हे दृश्य इतकं भयावह आहे की ते पाहून कोणाच्याही डोळ्यांचे पारणे फिटावे. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. (video of lightning strikes on tree during heavy rainfall viral video)
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे, पण हे पाहून तुमच्या कपाळालाही घाम फुटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सध्या पावसाळा आहे आणि काही झाडे दिसत आहेत. या दरम्यान वीज थेट झाडावर पडते. आपण पाहू शकता की जेव्हा वीज पडते तेव्हा आगीचा प्रचंड प्रवाह होतो. हे पाहून लोकांना 'थोर ऑफ मार्वल' चित्रपटाची आठवण होत आहे.
जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला कळेल की जेव्हा थोर पृथ्वीवरून त्याच्या जगात जातो तेव्हा तो हातोड्याने वीज निर्माण करतो, जी नंतर थेट त्याच्याकडे खेचली जाते. असंच काहीसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सरळ रेषेतील अग्नीप्रमाणे, वीज झाडावर पडते आणि ती पृथ्वीला फाडते. वीज पडल्यानंतर झाडाचे काय होते ते या व्हिडिओमध्ये तुम्हीच पहा.