राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेता असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ नसलं तरी विधानसभा अध्यक्ष आणि सरकार याबाबत मोठं मन दाखवून निर्णय घेऊ शकतो. विरोधी पक्ष नेते पद हे सरकारमधील एक महत्त्वाचा भाग असतो. विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित असल्याचं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं म्हणणं आहे.