उद्धव ठाकरे दोन दिवस बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. चिखली येथील सभा संपल्यानंतर ते बुलढाणा मार्गे मोताळा येथे देखील सभेसाठी जात आहेत. दरम्यान बुलढाणा मोताळा रोडवरील बालाजी मंदिराजवळ उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे लागलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत. या सर्व बॅनर वरील केवळ जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचेच फोटो फाडल्याच दिसून येत आहे. त्यामुळे हे बॅनर कोणी फाडले याचा तपास आता होणार आहे.