शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. जवळपास तासाभरापासून विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे.
ठाकरे गटाच्या वकिलांकडून याचिका एकत्र करण्यासंदर्भात युक्तिवाद सुरु आहे तर शिंदे गटाच्या वकिलांचा याचिका एकत्र करण्याला विरोध आहे. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचारला आहे.