विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच आज रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पक्षाची प्रचारसभा पार पडत आहे. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर केला.