महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची आज मुंबईत बिकेसी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र या सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे भडकल्याचे दिसले. बीकेसी येथे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवले, यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.