साताऱ्यामध्ये उदयनराजे उमेगदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित असतील. साताऱ्यामध्ये उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता साताऱ्यामध्ये देखील वातावरण तापलेलं आहे.
साताऱ्यामध्ये उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. शेवटपर्यंत साताऱ्याचा ससपेन्स हा महायुतीने कायम ठेवलेला होता. त्यानंतर प्रचाराला देखील आता सुरुवात झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून उदयनराजेंनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता युतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजे समर्थक जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.