महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला दागिने अर्पण करत असतात. अर्पण केलेले दागिने जतन करणे कठीण होऊन जाते. यामुळे मंदिर प्रशासनाने सोने वितळवण्याची परवानगी मागितली होती. त्या परवानगीस सरकारने अखेर मान्यता दिली आहे. दागिने वितळवण्यास राज्याच्या विधी व न्याय विभागाने मंजुरी दिलेली आहे. गेल्या १० वर्षात भाविकांनी अर्पण केलेले तब्बल २०४ किलो सोनं वितळवण्यात येणार आहे.