मुंबई विमानतळावरून साडेतीन किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. अबुधाबी येथून या सोन्याची तस्करी करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयने दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
अबुधाबी येथून येणाऱ्या विमानातून सोने आणण्यात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर विमानतळावर सापळा रचून विमानतळावरून दोन कर्मचाऱ्यांना सोन्यासह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आरोपींकडून 3502 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 2 कोटी 67 लाख 49 हजार 780 रुपये आहे.