मनोज जरांगे पाटलांच्या तिसऱ्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू करून आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. मनोज जरांगे हे उपचार घेत असल्याने त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणावर अद्यापही ठाम आहेत.
ते म्हणाले की, उपोषणावर ठाम राहणारच, कारण मी मराठा समाजासाठी लढतोय, माझ्या स्वार्थासाठी नाही लढत. माझ्या गोरगरीब कष्टकऱ्यांची लेकरं मोठी झाली पाहीजे, त्यांना प्रत्येक वेळेस कोणी अडचणीत टाकल नाही पाहीजे. मराठांच्या कोण वाट्यात जातय हेच पाहायला मी इथे उभा आहे. मला काय वेदना होत आहेत, माझ्यात काय सुधारना होत आहे हे मी बघणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणले.