सरकारला विरोधकांना सोबत घेऊन काम करायचे नाही. हे भांबावून गेलेले सरकार आहे. सरकारकडून मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरू असल्याचा घणाघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता विधिमंडळात पोहोचला असून याबाबत आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे.