व्हिडिओ

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ

Published by : Dhanshree Shintre

भारतात बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु होणार आहे. मुंबईत बीकेसी अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची गर्दी आहे. अ‍ॅपल स्टोअर सुरु होण्याआधीच दुकानाबाहेर रांगा पाहायला मिळतायेत. रात्री 12 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे आहेत. आयफोन 16 हा भारतात विक्रीकरिता खुला करण्यात आला असतानाच मुंबई येथील बीकेसी परिसरात असणाऱ्या जिओ ड्राईव्ह मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.

दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलच्या iPhone 16 ची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीने 9 सप्टेंबर रोजी आपल्या इट्स ग्लोटाइम या वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमामध्ये एआय फिचरसह आयफोन 16 सीरिज लॉन्च केली होती. अ‍ॅपल स्टोअर उघडण्याच्या आधीच सकाळी सकाळी लोकांनी स्टोअरच्या बाहेर गर्दी केली होती. iPhone 15 लॉन्च झाला होता, तेव्हाही अशाच प्रकारची उत्सुकता दिसून आली होती.

आयफोन 16, 128 जीबी 79000 असून जसे आयफोन सिक्सटीनचे स्टोरेज वाढत जाईल त्या प्रकारे त्याची किंमतही वाढत जाणार आहे एकूण 159000 पर्यंत आयफोन सिक्सटीनची किंमत असणार आहे तर अजून चार रंगात आयफोन उपलब्ध आहेत. फोनची कॅमेरा तितकाच प्रभावी आहे. 48MP फ्यूजन कॅमेरा 2रा-जनरेशन क्वाड-पिक्सेल सेन्सर आणि शून्य शटर लॅगसह योतो. नवीन 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 120mm फोकल लांबीसह 5x टेलीफोटो लेन्स फोटोग्राफिक क्षमता वाढवतात, तर कॅमेरा कंट्रोल परिपूर्ण शॉट कॅप्चर करण्यासाठी पर्याय देतं. व्हिडिओ फ्रंटवर, iPhone 16 Pro 4K120 कॅप्चरला सपोर्ट करतं. डॉल्बी व्हिजनमध्ये फ्रेम-बाय-फ्रेम कलर ग्रेडिंगसह सिनेमॅटिक-क्वालिटी रेकॉर्डिंग सक्षम करतं. डिव्हाइसमध्ये ऑडिओ कॅप्चर देखील आहे.

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये