राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा निर्णय आज होऊ शकतो. लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची कारवाई आजच होऊ शकते. सुप्रीम कोर्टाने 4 ऑगस्टला राहुल गांधींना मोदी आडनाव मानहानी खटल्यात दिलासा दिलाय. त्यामुळे राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे दस्तावेज अध्यक्षांच्या ऑफिसला मिळाले आहेत. त्यानुसार अध्यक्ष ओम बिर्ला आज निर्णय घेतील अशी शक्यता आहे. राहुल यांना आजच खासदारकी परत मिळाली तर अविश्वास प्रस्तावावेळी ते सभागृहात उपस्थित असतील.