महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाल्याचे बघायला मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक महिला घोटी येथील स्टेट बँकेच्या परिसरामध्ये मुक्कामी असल्याचे बघायला मिळालं आहे.
परंतु स्टेट बँक प्रशासन योग्य ते सहकार्य करत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. योग्य माहिती मिळत नसल्यानं रात्र रस्त्यावर काढावी लागत असल्याच महिलांनी सांगितलं. त्यामूळे घोटी स्टेट बँक प्रशासन कामाचा वेग वाढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.