अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी डिडोळकर यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या सूचना यूजीसीनं विद्यापीठांना केल्या आहेत. यूजीसीच्या या आदेशाला ठाकरे गटाच्या युवासेनेनं विरोध केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षांची जयंती विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांनी का साजरी करावी, असा प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केला आहे. डिडोळकर हे आरएसएसचे प्रचारक होते. यूजीसी आरएसएससाठी काम करत आहे का, असा सवालही युवासेनेनं उपस्थित केला आहे.