राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी होणार आहे. महायुतीकडून ७ नावे निश्चित झाली असून दुपारी १२ वाजता आमदारांचा शपथविधी होईल. दरम्यान, या शपथविधी विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीविरोधात याचिका दाखल केली आहे.