शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडले...शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाहीयं... पक्ष संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे... शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहे... आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होऊ शकतात, अशा चर्चा रंगल्या आहेत
तेजस ठाकरे नुकतेच कोल्हापूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले. त्यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचे दर्शन घेतले. यामुळे तेजस ठाकरे यांची राजकारणात एंन्ट्री होऊ शकते. राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यांसारख्या नेतृत्वातून युवासेना तयार झाली आहे. यामुळे युवासेनेचे नेतृत्व तेजस यांच्यांकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या काळापासून ठाकरे कुटुंब सार्वजनिक जीवनात आहे. प्रबोधनकार समाजसेवत होते. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब यांच्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते धडपडत आहे.
तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबातल्या चौथ्या पिढीतले आहेत. बाळासाहेबांप्रमाणेच तेजस ठाकरे यांना प्राण्याची आवड आहे. तेजस ठाकरे हे पक्षाच्या व्यासपीठावर अधूनमधून दिसत असले तरी त्यांनी राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले. पण, शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात येण्याची हीच ती योग्य वेळ आहे का? यावर ठाकरे कुटुंबात गंभीर चर्चा सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्या एका भाषणात तेजस हा आपल्यासारखाच असल्याचे म्हटले होते. आदित्य मवाळ आणि शांत आहे. परंतु तेजस आक्रमक असल्यामुळे त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न शिवसेना करु शकते.
तेजस यांचे संशोधन...
हिरण्यकश नदीत माशाची नवीन प्रजाती शोधून काढली. त्याला 'हिरण्यकेशी' नाव दिले.
गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा आणि त्याचबरोबर पाल आणि साप यांच्याही नवीन प्रजाती शोधल्या.
बेडकांची अंडी खाणाऱ्या मांजऱ्या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध पश्चिम घाटात लावला.
शिवसेनेचा राजकीय सामना वाचवण्यासाठी कॅप्टन उद्धव ठाकरे यांनी तेजोयम व्हिव्हियन रिचर्डच्या हाती बॅट दिली तर शिवसेनेला पुन्हा उभारी मिळेल. कारण, सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेला नव्या 'तेजा'ची गरज आहे.