29 जूनला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप पटकावले. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब झाला आणि अखेर टीम इंडियाचे पाच दिवसांनी मायदेशात आगमन होणार आहे.
याच पार्श्वभुमीवर जग्गजेतेपदाचा आज मायानगरीत जल्लोष होणार आहे. मुंबईमध्ये आज टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक संध्याकाळी मरीन ड्राइव, नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी काढण्यात योणार आहे. तर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या सत्कार देखील करण्यात येणारआहे.
दुपारी 4 वाजता टीम इंडिया ही दिल्लीतून मुंबईत येणार आहे. यासाठी मुंबईत टीम इंडियाच्या स्वागताची मोठ्या जल्लोषात तयारी करण्यात आली आहे. तसेच स्वागतादरम्यान सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे. तर टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झालेले पाहायला मिळत आहे.