राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली आहे. तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त आलेला आहे. उमेदवारांना नियुक्तीसाठी आता दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच तलाठी पदांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीसाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. गेल्या वर्षी एकूण 4,688 जागांसाठी ही भरती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती त्या बाबतीत अद्यापही रखडलेलीच आहे.