लोकशाही मराठीचा चॅनेल बंद करण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करत सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोकशाही चॅनेल हे नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलं आहे. जे अत्यंत उपेक्षित, पीडित आणि ज्यांची बातमी कधी कोणी केली नाही, ती बातमी लोकशाही चॅनेलने केली आहे. लोकशाहीने कायम खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटनेतील त्या प्रत्येक वंचित, उपेक्षिताला न्याय देण्याचा आणि त्या दुबळ्यांचा खऱ्या अर्थाने आवाज होण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांनी म्हंटले आहे.
आज तो आवाज दाबण्याचा प्रयत्न जर कोणी आपल्या संख्याबळाच्या आधारावर आणि सत्तेच्या मुजोरीवर करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. आम्ही कालही लोकशाही चॅनेलसोबत होतो, आम्ही आजही लोकशाही चॅनेलसोबत आहोत, असे सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.