बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दोघांना बीड पोलिसांसह पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून दिले जात नव्हते. या प्रकरणी अनेक ठेवीदारांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती आणि याच कोट्यावधींच्या घोटाळाप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात सुरेश कुटे यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल आहेत. ज्ञानराधा पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांचा जीव टांगणीला होता. आज अखेर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे.