छगन भुजबळांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. 2 जुलैचा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी शरद पवारांना अंधारातच ठेऊन झाला होता, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
भाजपचे विचार पटत नसल्यानं भाजपकडून आलेली ऑफर धुडकावल्याचा दावाही सुप्रिया सुळेंनी केला असून भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्यानं शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. भाजपसोबत जाण्यासाठी पवारांनी राजीनामा दिल्याचा दावा भुजबळांनी केला होता त्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी हे भाष्य केलं आहे.