महिला आरक्षण विधेयकावरील चर्चा सुरू असताना डीएमकेच्या खासदार कनिमोझी बोलायला सुरूवात करत असताना भाजप खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे जबरदस्त भडकल्या. त्यांनी अध्यक्षांकडे कनिमोझींसाठी संरक्षण मागितले.