गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकशाही मराठीने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसून आले. त्याच संदर्भात लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशातच हा गुन्हा सूडबुद्धीने दाखल करण्यात आला असून लोकशाहीची ही गळचेपी असल्याचा ठाण्यातील विश्वकर्मा समन्वय समितीने म्हटले आहे. ठाण्यातील विश्वकर्मा समन्वय समितीतील सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कमलेश सुतार यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केला आहे.