मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधव सहभागी झाले आहेत. बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बंद शांततेत करण्याचे आवाहन प्रशासन व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.