अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारस़ंघातील आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना पक्षाध्यक्ष या नात्याने पाठवलेली ही नोटीस लोकशाही हाती आली आहे.
शरद पवारांनी मागील महिन्यात वडगाव शेरीमध्ये सुनिल टिंगरेचे विरोधी उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहिर सभेत सुनिल टिंगरेंच्या मे महिन्यात झालेल्या पुण्यातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील सहभागावरुन टिका केली होती. त्यानंतर आमदार सुनिल टिंगरेंनी त्यांच्या वकिलामार्फत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय कॉंग्रेस या तिन्ही विरोधी पक्षांना नोटीस पाठवल्या.
या नोटीस त्या त्या पक्षाच्यया पक्षप्रमुखांना उद्देशुन होत्या ज्यामधे आपल्याबद्दल बदनामीकारक वक्तव्ये केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि बापु पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे हे आपल्याबद्दल सोशल मिडीयावर अवमानकारक मजकुर लिहीत असल्याचही या नोटीशीत म्हटलंय.
सुप्रिया सूळेंनी बापु पठारेंच्या प्रचारसभेत बोलताना आमदार सुनिल टिंगरेंवर शरद पवारांना नोटीस बजावल्या बद्दल टिका केली होती. त्यानंतर आपण शरद पवारांना नोटीस पाठवली नसुन महाविकास आघाडीतील पक्षांना नोटीस पाठवल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न आमदार टिंगरे यांनी केला होता